शेगाव येथे महिला बेपत्ता

तर भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । श्री संत गजानन महाराजांचे दर्शना करिता शेगाव येथे जाते असे सांगून घरून निघालेली ६० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. १९ फेब्रुवारी रोजी घडली.
याबाबत पती के शव तुकाराम जाधव वय ६७ रा. वेणी ता. लोणार जि. बुलढाणा यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे की त्यांची पत्नी १९ फेब्रुवारी रोजी दर्शनासाठी जाते असे सांगून निघून गेली आणि परत आली नाही. धुपता केशव जाधव यांचे वर्णन रंग गोरा, उंची ५ फूट ४ इंच, बांधा मजबूत, अंगात हिरव्या रंगाचे पातळ आणि गुलाबी रंगाचा
ब्लाउज, पायात स्लीपर, केस काळे पांढरे, कानात कानातले, हातात बांगड्या सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. फिर्यादी यांनी शेगावातील मंदिर परिसरात, भूष्कटी मळा तसेच आनंद विसावा येथे विचारपूस केली असता वरील वर्णनची महिला परिसरात दिसली असल्याची काही नागरिकांनी माहिती दिली त्यानंतर ही महिला परत शेगावात दिसून आली नाही. यावरून फिर्यादी यांनी हरवल्याची तक्रार पोस्टेला दिली. यावरून शहर पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तपास पो.ना. गाडगे यांचे कडे दिला आहे.



