महाशिवरात्रीला झाला कलशारोहन सोहळा संपन्न , ११ मार्चला किर्तन व महाप्रसाद!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
हिवरखेड दि.१० ; हिवरखेड येथील शंकर संस्थान देवळीवेस येथे महाशिवरात्री निमित्त सालाबाद प्रमाने ह.भ.प. संतोष महाराज टिकार शेगाव यांचे व्यासपीठच्या नेतृत्वात सोमवार दि.०४ मार्च २०२४ रोजी पासुन ते ११ मार्च २०२४ पर्यंत या दहा दिवसीय शिवमहापुरान कथेचे आयोजन केले . दि.०४ मार्च ला कथेला सुरुवात झाली ,तर लेकीबाळी व गावकर्यां कडून मिळालेल्या देणगी दानातुन , जिर्णोद्वार होवून डमरुधारी मंडळाकडुन कळसाची गावातुन मिरवनूक काढली तर दि. ७ व ८ मार्च ला शिवरात्री दिनी ३१ जोडपे व पौरोहिताकडुन हवन वीधी होवून कलशस्थापना, मूर्तीस्थापना,तसेच शिवपुरान कथा वाचक संतोष महाराज टिकार यांचे हस्ते झाली.
हिवरखेड मधे दैनदिनी प्रमाने शिवपुरान कथा, व रात्रीला कीर्तन होत आहेत तर शेवटच्या दिवशी कथा वाचक श्री ह.भ.प. संतोष महाराज टीकार यांचे व वारकरी , माळकरी , टाळकरी यांचे नेतृत्वात ११ मार्च चे सकाळी ८ वाजता ग्रंथ दिडीं व शिवपालखी मिरवनूक काढन्यात येईल आणि त्यानंतर संतोष महाराज टीकार यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर १२त ५ या वेळेत महाप्रसादाने सांगता होईल असे श्री शंकर सस्थांन देवळी वेस भागवत सेवा समीती कडुन भावीकांना कथा श्रवनासाठी आव्हाहन केले आले.



