शेगाव महामंडळ भंगार बस खामगाव व शेगाव रस्त्यावर बंद पडली बस प्रवासी त्रस्त

शेगाव महामंडळ भंगार बस खामगाव व शेगाव रस्त्यावर बंद पडली बस प्रवासी त्रस्त
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव
प्रतिनिधी श्याम पहूरकर
शेगाव | बुधधावार २० सप्टेंबर रोजी खामगाव येथून शेगावला येत असलेली एमएच १४ बीटी २८९६ क्रमांकाची बस वाटेत खामगाव रोडवरील हॉटेल पंचवटी इन समोर दुपारी ४ वाजता बंद पडली. त्यामूळे त्या बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अलिकडेअशाप्रकारे रस्त्यात बस बंद पडण्याच्या घटना नेहमीच उघडकीस येत आहेत. त्यामूळे एसटीचा प्रवास आता राम भरोसे झाल्याच्या प्रतिक्रीया प्रवासी व्यक्त करित आहेत. नवीन बसेस खरेदी करून महामंडळाच्या खेम्यात पाठविण्याचे आश्वासन सरकारकडून सद्यस्थितीत महामंडळाच्या बसेसची इतकी दुर्दशा झालेली आहे की, कोणत्या कारणाने या बसेस कधी बंद पडतील याचे काही सांगता येत नाही. ते तर महामंडळाचेच चालक आहेत की मजबूरीने त्यांना अशा भंगार बसेस चालवित आहेत. त्यातही रस्त्यावर बसमध्ये अचानक काही बिघाड झाल्यास अधिकान्यांचा चौकशीचा ससेमिरा मागे आहेच. त्यामूळे महामंडळाचा चालकवर्ग चिंताग्रस्त आहे. त्याकरिता भंगार बसेस काढून त्याजागी नवीन बसेस आणण्याची नितांत गरज आहे.अनेकदा दिले गेले आहे. मात्र दोन वर्षांपासून नवीन बसेसची वाट पाहून चालक-वाहकांसह प्रवासी वर्गही थकला आहे. तर इकडे विविध कारणांनी रस्त्यात बस बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहेत. एवढेच नव्हे तर महामार्गावर शेगाव आगाराच्या बसचे ब्रेक फेल झाल्याचा प्रकारही पंधरा दिवसापूर्वी घडला आहे. यामूळे एसटी महामंडळाला प्रवाशांची विश्वासहर्ता टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एवढे मात्र निश्चित !



