सोनाळ्याचा वृध्द शेगाव येथून बेपत्ता

सोनाळ्याचा वृध्द शेगाव येथून बेपत्ता
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरसोनाळा :- येथील ६६ वर्षीय वृद्ध शेगाव बस स्थानकातुन दिड महिन्यापासून बेपत्ता झाल्याची तक्रार शेगाव पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे औरंगाबाद येथील वैद्यकीय उपचारासाठी जातो असे सांगून सोनाळा येथील पंचशील नगरचे श्रीपत सखाराम वानखडे शेगाव येथून २९ जानेवारी रोजी गेले होते मात्र त्यांच्या मोबाईल बंद असल्याने सर्वत्र शोध शोध केली असता आढळून आले नाही म्हणून १ फेब्रुवारी रोजी शेगाव पोलीस स्टेशनला. श्रीपत वानखडे बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी बेबाबाई श्रीपत वानखडे यांनी दिली बेपत्ता श्रीपत वानखडे ची उंची ५ फूट ४ इंच अंगात पांढऱ्या रंगाचे लाल रेषा असलेले शर्ट व पांढरा पॅन्ट पायात काळा बूट आहे हातावर श्रीपाद बेबाबाई असे गोंदलेले आहे दवाखान्याचे काम सांगून शेगाव येथून औरंगाबाद येथे उपचारकामा असे सांगून निघून गेले आहे



