महाराष्ट्रविदर्भ

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी सौ तृप्ती सचिन वाठ यांची निवड.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर रेल्वेतून

प्रवासकरणाऱ्या महिलांना प्रवासादरम्यानउद्भवणाऱ्या विविध समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्ष पदी सौ. तृप्ती सचिन वाठ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दिनांक१४ फेब्रुवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी बडनेरा येथील प्रख्यात समाजसेविका व सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच माळी महासंघ महिला आघाडीच्या बडनेरा मंडळ अध्यक्षा सौ. तृप्ती सचिन वाठ यांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदासाठी नाव सादर केले याबैठकीमध्ये उपस्थित राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सर्वपदाधिकारी व सदस्यांनी सौ तृप्ती वाठ यांची संघटनेच्याअमरावती जिल्हाध्यक्ष पदावर एकमताने निवड करण्यास सहमती दर्शविली त्यामुळे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर सौ तृप्ती सचिन वाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीला अमरावती विभागीय अध्यक्ष सौ अर्चना पवार, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ मंगला सोळंके, कार्याध्यक्ष सौ रुपाली वानखडे, लता तिवारी आदी सह अनेक महिला पदाधिकारीउपस्थित होते. सौ तृप्ती वाठ यांची राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी निवडीबद्दल रेल्वे महिला प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button