यूनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..!!!

मुक्ताईनगर, दि. १ मार्च २०२५ :
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे दमदार आमदार मा.श्री.चंद्रकांत भाऊ पाटील, डॉ.प्रवीण बोदडे [बालरोग तज्ञ], प्रा.डॉ.प्रतिभा ढाके [Physical Director @श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय] या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितिमध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. आत्माराम मासूळे सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासूळे यांनी शाळेतील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना आपले कला गुण सादर करण्यासाठी अतिउत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कार्यक्रमचे नियोजन आणि चोख व्यवस्था बघून सर्व प्रमुख पाहुणे आणि पंचक्रोशीतिल पालक मंडळी व अन्य सर्व उपस्थितांनी मा. श्री. मासूळे सर, मा. सौ. मासूळे मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक आणि अभिनंदन केलं.
मुक्ताईनगर सारख्या शहरामध्ये सर्व अद्ययावत गोष्टींनी सुसज्ज असं व्यासपीठ Pre- Primary वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणं ही अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानस्पद बाब आहे. संपूर्ण व्यासपीठ आकर्षक वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी, अत्याधुनिक प्रकारची रोशनाई, उत्तम प्रकारची Sound System आणि विद्यार्थ्यांवर Performance नंतर पुष्पवर्षाव करणाऱ्या यंत्रासह छानपैकी सजावट केलेली होती.
सोबतचं व्यसपीठावरती लावलेल्या मोठ्या L.E.D. Screen वरुन शाळेत वर्षभर साजऱ्या केलेल्या विविध कार्यक्रमांचे Photos आणि Videos देखील प्रेक्षकांना दाखवण्यात आले.
मा. आमदार साहेब आणि आदी प्रमुख मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
नंतर मा. आमदार साहेब आणि प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून त्यांची मतं मांडली आणि शाळेला व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर मा. आमदार साहेब श्री. चंद्रकांतजी पाटील साहेब आणि सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते Olympiad Exam मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडला. सर्व विद्यार्थ्यांना Trophy आणि Certificate देऊन शाळेने त्यांच अभिनंदन पर कौतुक केले.
या चिमूकलयांना उपजत लाभलेल्या या कलगुणांचा सर्वोत्तम पद्धतीने विकास करता यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून शाळा सातत्याने प्रयत्नशील होती. विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीने नृत्य सादर करता यावा यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना शुभम तळेकर Choreographer उपलब्ध करून दिला. सर्व विद्यार्थ्यांनी अपेक्षेप्रमाणे उत्तम Performences सादर केलेत. व्हीआयपी Guests, महिला आणि पुरुष सर्व sections मध्ये स्थानापन्न झालेल्या सर्व प्रेक्षकांनी या चिमूकल्यांच्या Performences ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे LIVE प्रेक्षपण देखील समाज माध्यमांद्वारे करण्यात आले. तिथूनही अनेकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि भरघोस प्रतिसाद दिला.
एकंदरीत कार्यक्रम छान झाला. त्यासाठी शाळेचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!!!



