बुलढाणामहाराष्ट्र

जळगाव जामोद तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत खरीप हंगाम मोहीम ३ जून २०२६ रोजी कृषी तंत्रज्ञानाचा जागर कार्यक्रम अति उत्साहात संपन्न.!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी रतन भगत.

जळगाव जामोद दि.३/६/२६ तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद अंतर्गत महासिद्ध महाराज संस्थान सभागृह धानोरा येथे दिनांक ३ जून २०२६ रोजी खासगी सहकारी भागीदारी उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बुलढाणा व कृपामयी ग्रुप हिंगणे बुद्रुक तालुका जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मका, तूर ,कापूस पिकांचे व्यवस्थापन व नैसर्गिक शेती काळाची गरज कार्यशाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून माननीय श्री संतोष डाबरे साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच कृषी तज्ञ म्हणून लाभलेले डॉक्टर बी बी जडे साहेब वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांनी शेतकऱ्यांना कापूस तूर आणि मका लागवडीचे प्रगत तंत्रज्ञान समजावून सांगून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पाडली. तसेच त्यांनी स्वतःचे अनुभव शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच माननीय श्री आनंद खंडेलवाल विभागीय व्यवस्थापन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड अमरावती विभाग यांनी शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन व्यवस्थापन व त्यांचे होणारे फायदे याबाबत शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच माननीय श्री पद्माकर भाऊ चिंचोले व्यवस्थापक मयूर लाईन जामनेर यांनी नैसर्गिक शेती बाबत महत्त्व पटवून सांगून नैसर्गिक शेती करणे ही काळाची गरज आहे. याबाबत शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर माननीय श्री रमेश जाधव साहेब तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना बाबत तसेच सरी वरंबा पद्धतीचा अवलंब सूक्ष्म अन्नप्रक्रिया ,उद्योग योजना, आदर्श ब बालर व्यवस्था, शेतमालावरील विकास व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. अशाप्रकारे वरिष्ठ तज्ञ यांचे मार्गदर्शन धानोरा महासिद्ध येथील समस्त ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना लाभले. सदर कार्यक्रमास धानोरा महासिद्ध येथील सरपंच श्री विठ्ठल रामेश्वर पैसोडे श्री संदीप भाऊ भोपळे तसेच पोलीस पाटील श्री संगोपन नारायण अवचार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बचत गटाच्या महिलावर्ग व शेतकरी पुरुषवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सागर भाऊ राऊत यांनी केले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी सो यु पी वाघ व कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी कृषी सेवक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी श्री आर् .एन .जाधव साहेब यांनी केले. धानोरा महासिद्ध येथील सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button