खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

ठेकेदाराचा वाढदिवस दालनात साजरा करणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी:-

सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात आपले वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम साजरे करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना मुक्ताईनगरच्या विभागीय कार्यालयामध्ये कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण यांनी माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या ठेकेदाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा केल्याने कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्यालयीन वेळेमध्ये अशाप्रकारचे कार्यक्रम साजरे केल्यास शिस्तभंगाची कारवाई सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे परिपत्रक सरकारने काढले असताना महावितरण च्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी शासकीय परिपत्रकाला केराची टोपली दाखवत मर्जीतल्या ठेकेदाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा केल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा नाराजीचा सूर आहे. परंतु कार्यकारी अभियंत्यांच्या मर्जीपुढे कार्यालयीन कर्मचारी हातबल होऊन या कार्यकारी अभियंत्यांनी नियोजन केलेल्या कार्यक्रमांमध्ये हाजिर होत संबंधित ठेकेदारावर कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशानुसार शुभेच्छांचा वर्षाव करत फोटोसेशन करण्यात आले. संबंधित ठेकेदाराने कार्यकारी अभियंत्यांचा दालनातील वाढदिवस साजरा करतानाचा फोटो स्वतःच्या स्टेटसला ठेवत विभागीय कार्यातील इतर अधिकारी,कर्मचाऱ्यांना स्वतःची ताकद दाखवण्याचा सूचक इशारा असल्याचे बोलले जात आहे.मात्र या कार्यक्रमांवर सरकारी कार्यालयात बंदी घालण्यात आली असताना अश्या प्रकारचे कोणतेही कार्यक्रम सरकारी कार्यालयात साजरे केले गेले तर यापुढे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध झाले असताना सुद्धा कार्यकारी अभियंता मर्जीतल्या ठेकेदाराचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार महावितरण च्या कार्यकारी अभियंत्यांवर वरिष्ठांकडून शिस्तभंगाची कार्यवाही कधी केली जाणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button