बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा! कृषिमंत्र्यांचा ताफा अडवून काँग्रेसने सोपवले मागण्यांचे निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

खामगाव : पिकांच्या नुकसानामुळे
शेतकरी आर्थिक संकटात सापडले असुन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवून निवेदन दिले.२० सप्टेंबर रोजी खामगाव तालुक्यात पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री जात असताना पिंप्री गवळी फाट्यानजीक हा प्रकार घडला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या कृषी मंत्र्यांसमोर मांडल्या. पावसातील खंड, पिकांची झालेली हानी आणि उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत द्यावी, तसेच सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंग चव्हाण, शहराध्यक्ष स्वप्निल ठाकरे, शहर कार्याध्यक्ष किशोर भोसले, कैलास फाटे, अजय तायडे आदी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button