जळगावात भीषण अपघात; कारमध्ये दोन नंबर प्लेट व पोलिसांच्या काठ्या सापडल्याने खळबळ

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात
हरताळा फाट्यावर अर्टिगा कारचा अपघात; पाच जण जखमीहरताळा फाट्यावर गुरुवारी सकाळी अर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्टिगा कार वेगात येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख,काशीनाथ साळुंखे,मुरली कोळी,ज्ञानेश्वर कोळी याना जाऊन धडकली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी धाव घेतली आणि गावातील नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवले.या अपघातात दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून तीन जणांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप वानखेडे,पो कॉ दिपक ढाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.



