अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थ्यांनी गाठलं बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एम. बसेय्ये यांना निवेदन

अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थ्यांनी गाठलं बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एम. बसेय्ये यांना निवेदन
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेशेगाव – उमेश राजगुरे राहणार भोईपुरा शेगाव , मागील ३६ वर्षापासून कायम रहीवासी असुन नियमीत राशनकार्ड धारक आहे. परंतु सन २०१८ पासुन लाभार्थ्यांनी राशनकार्ड विभक्त केले आहे . तेव्हापासूनत्यांना राशन मिळणे बंद झाले आहे. तरी अन्न सुरक्षा योजना २०१३ प्रमाणे नविन विभक्त केशरी कार्डावर धान्य मिळण्याचा शासन निर्णय असून, त्याआधारे नियमीत राशन देण्यासाठी पात्र लाभार्थी ठरतात.तरी सुध्दा २०१८ पासुन राशन करीता वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळाला नाही. सदर बाब ही तहसिल कार्यालय, शेगाव येथे रितसर तक्रार अर्ज २२.०६.२०२१ रोजी उमेश राजगुरे सह ३६ लाभार्थ्यांनी दिला होता.त्यादवारे तहसिल कार्यालय, शेगांव यांचे पत्र दि. ०५.१०.२०२१ रोजी प्राप्त त्यांना झाले होते. .त्यामध्ये तहसिल कार्यालय यांनी पुरवठा निरक्षक शेगांव याना सदर बाबतीत चौकशी अहवाल सादर करण्याचे लिहले होते.दि. २३.०६.२०२२ रोजी मा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्र मिळाले तरी सुद्धा सदर प्रकीयेवर अदयाप पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. व तसेच त्यानंतर लाभार्थ्यांनी दि. २६.०७.२०23 रोजी मा. तहसिलदार साहेब, शेगांव यांना विनंती अर्ज दिला होता. सातत्याने हा प्रश्ना भूमिहीन शेतमजूर वर्गाचा असून सुध्दा पुरवठा विभागमार्फत याकडे दुर्लक्ष होत आहे.सदर शेगांव शहरातील अन्न सुरक्षा योजनेपासुन वंचित असलेल्या नागरीकाना दि. २३/०८/२०२३ पर्यंत सदर योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली.असे सदर मागणी करून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही शेगाव तहसिल कार्यालय समोर परिवारासह आमरण उपोषण करु याला प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील असे प्रतिपादन उमेश राजगुरे यांच्या मार्फत करण्यात आले.वंचितांना न्याय नाही मिळाला तर निषाद पार्टी तर्फे बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात येणार असे निषाद पार्टी चे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री दिलीपराव घट्टे यांनी केले.तसेच जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संजय भाऊ कुटे यांना सुद्धा प्रतिलिपी देण्यात येणार आहे.



