तेल्हारा शहरात २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेत आरोपींसह अन्य १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल! तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये परस्पराविरुद्ध तक्रार!स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी

तेल्हारा|
तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेत अखेर परस्पर विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यामध्ये महिलेचा विनयभंग, महिलांसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, लूटमार , जीवाने मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, आदी स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याची घटना नगर परिषद तेल्हारा हद्दीत दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडल्याचा प्रकार उघडकीस येत आहे . त्यावर आरोपी व फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवरही विविध कलमान्वये गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी १९ वर्ष युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे वडील त्यांच्या दुकानात बसून पैसे मोजत असताना आरोपी दुकानात आले त्यांनी अज्ञातास फोन लावले यावेळी १५ ते २० लोक तिथे आले यावेळी यांनी युवतीच्या वडिलांचे रुपये अडीच लाख हिसकावून सोबत असलेल्या लोकांजवळ दिले व ते निघून गेले त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या वडिलास लोटून दिले ते जमिनीवर पडले तेवढ्यात आरोपींनी फिर्यादीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचे माहिती मधून समोर येत आहे. यावेळी फिर्यादीने सुरक्षेसाठी आरोपीच्या डोळ्यावर स्प्रे मारला व आरोपीने हातातील फावड्याने फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता मार चुकवण्याच्या प्रयत्नात फिर्यादीच्या उजव्या हाताला मार लागून ती जखमी झाली. तसेच फिर्यादीच्या वडिलांना आरोपींनी जबर मारहाण केली असल्याचे तक्रारीवरून लक्षात येते. अशा तक्रारीवरून आरोपींसह व अन्य १५ ते २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.तर दुसऱ्या घटनेमध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादीच्या दुकानात आरोपी कुलूप तोडून बसले आहेत म्हणून फिर्यादी व त्यांची पत्नी हे दुकानात गेले असता यांनी फिर्यादीच्या अंगावर पाळीव कुत्रा छुवाडून दिला. फिर्यादीने कुत्र्यास लोटून दिले. यावेळी आरोपीच्या मुलीने फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने तिच्याजवळ असलेल्या कोणता तरी स्प्रे फिर्यादीच्या तोंडावर मारला तसेच हातातील स्टील रोडने फिर्यादीच्या डाव्या हातावर व कमरेवर तसेच डोक्यावर मारून जखमी केले.
फिर्यादी व त्यांच्या पत्नीस तीन गैर अर्जदार यांनी थापडा व बुक्क्यानी मारहाण केली आरोपी व अनोळखी इसमाने फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केला. आरोपीने तिच्या हातातील स्प्रे फिर्यादीच्या डोळ्यात तोंडावर मारून जखमी केले असता फिर्यादीस दिसेनासे झाले त्यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील ३० ग्रॅमची चैन किंमत अडीच लाख रुपये गैर अर्जदार पैकी कोणीतरी जबरदस्तीने तोडून घेतली अशा तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.



