क्राईमजळगावा जिल्हामहाराष्ट्र

भुसावळ शहरात मित्रानेच केला मित्राचा खुन ‘ आनंद नगरातील नेब कॉलनीत शाब्दिक वादातून मध्यरात्री घडली घटना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

– भुसावळ शहरातील आनंदनगर- नेब कॉलनी परिसरात शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री झालेल्या शाब्दिक वादातून मित्रानेच मित्राचा खुन केल्याची दुदैवी घटना घडली आहे . अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२, रा. आनंदनगर-नेब कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव असून किरकोळ वादातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे . खुन झालेला व्यक्ती व संशयित हे दोन्ही मित्र असल्याची माहिती समोर येत आहे .

प्राथमिक माहितीनुसार, रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास सावकारे यांच्यात त्याच परिसरातील एका तरुणाशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर झाडे लावण्याची सिमेंटची कुंडी डोक्यावर मारण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत सावकारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र घटना स्थळी च त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून संबधित पुरावे जप्त केले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीस त्वरीत अटक करण्याची यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button