आयटक बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा; एन. वाय. देशमुख जिल्हाध्यक्ष, मंगेश कानडे सचिवपदी

आयटकच्या जिल्हा सभेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड; कामगार चळवळ अधिक बळकट करण्याचा निर्धार
बुलढाणा | प्रतिनिधी (जी.डी. रोकडे)
अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
(आयटक) बुलढाणा जिल्हा शाखेची महत्त्वपूर्ण सभा २ ऑगस्ट रोजी कॉ. एस. ए. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत जिल्हा कार्यकारिणीची नव्याने निवड करण्यात आली. कामगार, अंगणवाडी, पोषण आहार, गिरणी कामगार आणि किसान सभेच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले.सभेत कॉ. एन. वाय. देशमुख (वर्कर्स फेडरेशन) यांची जिल्हाध्यक्ष, शशिकला नारखेडे (अंगणवाडी संघटना) यांची कार्याध्यक्ष, कॉ. महादेवराव पाटील (शालेय पोषण आहार संघटना) यांची उपाध्यक्ष, कॉ. मंगेश कानडे (वर्कर्स फेडरेशन) यांची जिल्हा सचिव, तुळसा बोपले (अंगणवाडी संघटना) यांची सहसचिव आणि कॉ. सुरेखा तळेकर (अंगणवाडी संघटना) यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.याशिवाय कॉ. विलास पाटील, कॉ. शैलेश तायडे, कॉ. गजानन देशमुख, कॉ. संगीता ठाकूर, कॉ. अलका राऊत, कॉ. शालिनी सरकटे, कॉ. रमेश अजेटीवाल, कॉ. समाधान हेलोडे, कॉ. केशव पोते, कॉ. भीमराव गवई आणि कॉ. गणेश ठाकरे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर कॉ. एस. ए. जाधव यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. कामगार, शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा उभारण्याचा संकल्पही सभेत करण्यात आला.



