खामगाव तालुक्यातील कोतवालांच्या 18 जागांसाठी 652 अर्ज दाखल उद्या पात्र ,अपात्र, उमेदवारांची लागणार यादी…

खामगाव तालुक्यातील कोतवालांच्या 18 जागांसाठी 652 अर्ज दाखल उद्या पात्र ,अपात्र, उमेदवारांची लागणार यादी…
.(. जीडी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी) खामगाव तहसील अंतर्गत कोतवालांच्या 18 रिक्त जागा करिता पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे खामगाव तालुक्यातील 22 जागा रिक्त आहेत यामधील 18 जागांसाठी पद भरती होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी तहसीलदार अतुलजी पाटोळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत करण्यात आली होती. नंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती 6 ऑक्टोबरहा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत 18 जागांसाठी तब्बल 652 अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे कोतवाल या पदासाठी फक्त चौथा वर्ग पास ची अट होती. परंतु या कोतवाल भरती साठी पदवीधर, उच्च पदवी प्राप्त, उच्च पदवी प्राप्त , उमेदवार ही रिंगणात असल्याचे दिसून आले आहे. तसेच एम .पी. एस. सी.परीक्षेची तयारी करणारे उमेदवार देखील या कोतवाल भरतीसाठी अर्ज केले आहे. त्यामुळे 652 अर्जापैकी 18 जागा करिता पात्र, अपात्र , उमेदवारांची यादी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…



