चिखलीच्या महिला आमदाराकडून अशोक खरातचा साधा निषेधही नाही..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस (प्रतिनिधी)
राहुलभाऊंच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी सरसावल्या ॲड. वृषालीताई बोंद्रे
चिखली : चिखलीमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आदरणीय राहुलजी बोंद्रे यांच्या विरोधात जे आंदोलन केले आणि जो निषेध व्यक्त केला, ती घटना अतिशय निंदनीय आहे. आम्ही सर्व महिला या कृत्याचा जाहीर निषेध करतो. राहुलजी बोंद्रे यांनी पक्षाच्या पत्रकार परिषदेत फक्त एक संदर्भ दिला होता. यात कुठेही चुकीचे वक्तव्य असल्याचे आम्हाला वाटत नाही. भाजप महिला आघाडीकडून या विषयाचे नाहक राजकीय भांडवल केले जात आहे. राहुलजी बोंद्रे हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे आणि महिलांप्रती असलेला त्यांचा आदर संपूर्ण जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांची ‘अनुराधा’ संस्था आणि त्यांच्या पत्नीची ‘हिरकणी’ नावाची पतसंस्था ही देखील महिलांच्या नावावरच आधारित आहे. अशी व्यक्ती कधीही महिलांचा अनादर करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच, ज्या महिलांनी हे चुकीचे आंदोलन केले आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा ॲड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी केली आहे.
हिरकणी महिला अर्बनच्या अध्यक्षा ॲड.सौ. वृषालीताई बोंद्रे म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, आपल्या चिखली मतदारसंघातील महिला आमदार, ज्या जिजाऊंच्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत त्यांनी अशोक खरातच्या या निंदनीय कृत्याचा साधी निषेधही व्यक्त केला नाही. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले, त्यांना चुकीची वागणूक दिली, पण तरीही एका महिला आमदाराने यावर मौन बाळगणे ही खरंच लाजीरवाणी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.



