काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली प्रतिकात्मक बसतेजेंद्रसिंह चौहान यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे आंदोलन

स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा ) ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
खामगावः बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून एसटी बसच्या कमतरतेमुळे आणि भंगार बसेसमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध होत नाही. बस मिळाली तर त्यामध्ये इतर प्रवाशीच जास्त असल्याने विद्यार्थ्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो. काही ठिकाणी वाहक बस थांबा असून, सुध्दा बस थांबवत नाहीत. तर नादुरस्त बसेसची संख्या आगारांमध्ये जास्त असल्याने या भंगार बसेस कुठेही बंद पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाच वाजता शाळा सुटली तरी रात्री आठ वाजेपर्यंत बसची वाट पाहात उभे राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात त्या तालुक्यातील आगार प्रमुखांशी याबाबत चर्चा करुन, तक्रारी करुन देखील अधिकारी याबाबत वेळकाढू धोरण अवलंबत आहेत. त्यामुळे मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. या सर्व बाबींचे गांभीर्य लक्षात घेवून, आज काँग्रेस सेवादलचे प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांच्या नेतृत्वात खामगाव येथे आगार प्रमुखांमार्फत खेळणे स्वरुपातील प्रतिकात्मक बस मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांना पाठवून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत सुध्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यांना ही बस पाठवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुध्दा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर, काँग्रेस सेवादलचे प्रदेश कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे सचिव अजय तायडे, काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमित तायडे, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष साहिल देशमुख, शहराध्यक्ष सौरभ रिछारिया, चेतन काकडे, शुभम मोरे, हरिसिंग चव्हाण, केतन चव्हाण, आेम दहिभात, दत्ता भिल, चेतन धोत्रे, अविनाश दांदळे, गोपाल वाघ, ऋषीकेश कोकाटे, दुर्गेश खोडके, विशाल गाडे, सचिन सरदार, हरिओम हिवरखेडे, वाल्मीक वनारे, चेतन चव्हाण, अभिषेक धोत्रे, निरजंन तायडे, दत्ता पानझाडे, प्रदीप पानझाडे, शादब अली यांची उपस्थिती होती.



