माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मागणीला यश

**उत्तर महाराष्ट्रातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या दर्शनी भागात रुग्ण हक्क सनद लावण्याबाबत आरोग्य उपसंचालक यांनी काढले आदेश.* नाशिक /जळगाव – मानवी हक्क अयोग भारत सरकार यांनी दि – १३ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या वेबसाईटवर रुग्णांची हक्काची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) प्रकाशित केली आहे. सदर रुग्णांच्या हक्काची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) जशीच्या तशी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वीकारली आहे. तसेच हि सनद सर्व राज्य( सरकार यांना पाठवलेली आहे आणि राज्य सरकारांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थे मार्फत हि सनद सर्व शासकीय व खाजगी अशा प्रत्येक रुग्णालयात लागू करावी असे निर्देशही केंद्र सरकारने दिलेले आहेत. राज्य सरकारनेही या बाबत रुग्णालयांना आदेश दिलेले आहे. परंतु महाराष्ट्रातील सर्वच खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या हक्काची सनद लावली जात नव्हती. यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी ईमेलद्वारे निवेदन दिले. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव -०१, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मा. सचिव, – ०१, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मा. सचिव, – ०२, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, मा. आयुक्त, (आरोग्य सेवा) व अभियान संचालक, (रा.आ.अ), मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य इड्स नियंत्रण संस्था, मुंबई, मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक विभाग, नाशिक, मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, मा. आयुक्त, महानगर पालिका, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना लेखी निवेदन ईमेल द्वारे पाठवलेले होते. सदर निवेदनाचा आशय असा की , उत्तर महाराष्ट्रातील सर्व खाजगी व शासकीय रुग्णालयात सदरील रुग्णांच्या हक्काच्या सनदी लावलेल्या नसल्याने सदर खाजगी व शासकीय रुग्णालय यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच आपण या रुग्णहक्कांची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याचे सर्व खाजगी व शासकीय रुग्णालय यांना त्वरित आदेश द्यावेत व त्याबाबत उपाय योजना राबवण्यात. व आदेश निर्गमित करून त्यांची प्रभावी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. त्यास यश मिळाले आहे. सदर निवेदनाची दखल घेऊन आरोग्य सेवा नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी दिनांक २८/०३/२०२३ रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, व अहमदनगर या जिल्ह्यातील शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय , जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी. महानगर पालिका / नगर पालिका,नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, व अहमदनगर व वैद्यकीय अधीक्षक. विभागीय संधर्भ सेवा रुग्णालय, नाशिक. या उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील विभागांना रुग्णांची हक्काची सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) सर्व खाजगी व सरकारी रुग्णालयांनी हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात लावण्याबाबतचे परिपत्रक काढून रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण हक्कांची हि सनद लावण्याची अंमलबजावणी झाल्यास रुग्णांना त्यांच्या पुढीलप्रमाणे अधिकारांची माहिती मिळेल . कोणत्याही पूर्व अटी न लावता व उपचार सुरु करण्याच्या अगोदर पैश्यांची मागणी न करता पहिल्यांदा पेशंटला सर्वात्तम, सुरक्षापूर्ण व दर्जेदार तसेच तातडीने वैदकीय सेवा देऊन पहिल्यांदा रुग्णांचा जीव वाचविणे हॉस्पिटल व डॉक्टरांचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या कलम २१ प्रमाणे प्रत्येक भारतीयांना जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने सुरक्षित राहिला पाहिजे. या साठी रुग्णांच्या हक्काची सनद रुग्णालयांच्या दर्शनी भागात लावणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकांना पुरेशसी माहिती मिळण्याचा हक्क, आजाराचा प्रकार, त्याची कारणे, तपासण्यांचे तपशील, काळजी, उपचारांचे परिणाम, त्यामुळे होणारी गुंतागुंत, आणि अपेक्षित खर्च, रुग्णाच्या नोंदी, केसपेपर, तपासण्यांचे अहवाल, आणि सविस्तर बिले मिळण्याचा हक्क, उपचारासाठी माहितीपूर्ण संमतीचा हक्क, रुग्णाने निवडलेल्या डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन मागविण्याचा हक्क, उपचारादरम्यान गोपनीयता, खाजगीपणा तसेच मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क, पुरुष डॉटरांकडून महिला रुग्णाची तपासणी होत असतांना स्री कर्मचारी किंवा नातेवाईक सोबत असण्याचा हक्क, एचआयव्ही बाधित असल्यास भेदभावरहित उपचारांचा आणि माणुसकीचा हक्क, पर्यायी उपचार पद्धती निवडण्याचा हक्क, रुग्णहक्क सनद ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) मध्ये असणे अपेक्षित आहे.



