अकोलाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पळशी झाशी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी १० हजारांची स्टीलची सीढी दान, गुणवंतांचा सत्कार व विकासकामांचे भूमिपूजन……!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २६ जून २०२६
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली. यावेळी गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक आदरणीय कैलासभाऊ मारोडे हे होते. गावातील बुद्ध विहारातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना नागरिकांना होणारी अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य भगतसिंग उर्फ राजूभाऊ पवार यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून सुमारे दहा हजार रुपये किमतीची स्टीलची सीढी दान म्हणून भेट दिली. या सामाजिक योगदानाबद्दल भीम कीर्ती युवक क्रीडा मंडळ व बौद्ध समाजाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर काशीरामभाऊ कुयटे यांच्या घरामागील रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. गावाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या या कामाचे नागरिकांनी स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कृत म्हाडा विभागात असिस्टंट इंजिनिअर पदावर स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या सिद्धांत मिलिंद सोनोने यांचा युवा उद्योजक कैलासभाऊ मारोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, संभाजीनगर या कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्रेरणा श्रीराम बांगर हिने बी.ए. एलएलबी प्रथम वर्षात उत्कृष्ट गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व परिवर्तनवादी कार्याचा आढावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अभय मारोडे व युवा उद्योजक कैलासभाऊ मारोडे यांनी आपल्या भाषणातून घेतला. शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित व मागास घटकांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती कैलास भाऊ मारोडे, तेजरावभाऊ मारोडे, पद्माकरभाऊ मारोडे, राजूभाऊ मुयांडे, जि. प. सदस्य राजूभाऊ पवार, विजयभाऊ ठाकरे, विजयभाऊ मारोडे, प्रकाशभाऊ राहणे, राजूभाऊ ईगळे, गणेशराव दोरकर, गजाननभाऊ भड, रामनारायणभाऊ चितोडे, तेजरावभाऊ बाजोडे, श्रीराम बांगर ग्रा.प. मा. सरपंच प्रियंका ताई मेटांगे, अभयसिंग मारोडे, संगीता ताई चितोडे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, वर्षाताई बांगर, अमोल दामले, ग्रा.प सदस्य सुरेश भाऊ हेलगे, उमाकांत कोठे, डॉ अनंता आमले, राहुल मेटांगे, अशोक भिवटे, करुणानंद तायडे, सुजित बांगर, कडू भारसाकडे, हरिदास बांगर, सुमेध गवई, संदेश हिवराडे, विशाल बांगर,अमोल दामले, सुमेध गवई, हरिदास बांगर, करुणानंद तायडे, सुजित बांगर, विशाल बांगर, संजू वानखडे, सुनील सोनवणे, गोपाल मारोडे, रमेश गवई, सदाशिव गवई, अंगणवाडी सेविका करांगडे मॅडम, उज्वलाताई बांगर, नर्मदाबाई भारताकडे, प्रेरणा बांगर, ललिता बांगर, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुणानंद तायडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीराम बांगर यांनी मानले. भीम कीर्ती युवक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. सामाजिक एकोपा, गुणवंतांचा गौरव आणि विकासाची दिशा देणारा हा कार्यक्रम पळशी झाशी ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला. दानशूरता, गुणवंतांचा सन्मान आणि विकासकामांचा शुभारंभ पळशी झाशी येथे शाहू महाराज जयंतीला सामाजिक ऐक्याचे अनोखा संदेश……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button