बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरामध्ये रा.स्व.संघाच्या पथसंचलनावर पुष्पवर्षाव ! शक्तीसंपन्न व शिलवान स्वयंसेवक घडविणे हिच रा.स्व.संघाची शिकवण :नितीन जांभोरकर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे ता.प्रतिनीधी

तेल्हारा दि.३१: तेल्हारा शहरांमध्ये रविवार दि.२९ ऑक्टो .२०२३ रोजी विजयादशमीच्या औचित्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शहरात पथसंचलनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते,या पथसंचलनावर घराघरातून पुष्पवर्षाव करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण तसेच शस्त्रपूजनाने करण्यात आली, जगदंबा मातेने महिषासुराचा वध केला, श्रीरामांनी रावणाचा वध केला, पांडवांनी लपवुन ठेवलेली शमी वृक्षावरील शस्त्रे उतरविली,डॉ हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली,समतायुक्त समाज उभा करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले तो विजयादशमीचा दिवस होता.शक्तीच्या उपासनेसोबतच शिलवान स्वयंसेवक घडविण्याचे कार्य रा.स्व संघ करीत आहे.असे प्रतिपादन रा.स्व.संघाचे प्रांत महाविद्यालयीन कार्यप्रमुख नितिन जांभोरकर यांनी दि.२९ ऑक्टोबर रोजी तेल्हारा संघ शाखेच्या विजयादशमी व शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले. तेल्हारा येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या सभागृहात रा.स्व. संघ शाखा तेल्हाराचा विजयादशमी व शस्त्रपूजन कार्यक्रम प्रसंगी मंचावर तालुका संघचालक माधव बनकर,नगर संघचालक गजानन मुंजे,प्रमुख अतिथी मातोश्री पतसंस्थेचे अध्यक्ष कमल चांडक,मुख्यवक्ते प्रांत महाविद्यालयीन कार्यप्रमुख नितीन जांभोरकर उपस्थित होते. मान्यवरांचे आगमन होताच स्वयंसेवकांनी स्वागत प्रणाम देऊन त्यांना सन्मानित केले. मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आल्यावर ध्वजारोहण, प्रार्थना,गणवेशातील स्वयंसेवकाचे सांघिक व्यायाम योग,सांघिक गीत झाले.शहर सहकार्यवाह मनिष गोयनका यांनी मान्यवरांचा परिचय व प्रास्ताविक केले.अमृत वचन पार्थ पोहने व सुभाषित कथन लोकेश उजाड यांनी केले.चैतन्य नळकांडे यांनी वैयक्तिकत गीत गायीले. भारताचा आत्मा धर्म आहे एकरस समाज ही देशाची मानसिक शक्ती आहे.ती सुदृढ करण्याचे काम संघ अविरत करित आहे.सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन,पर्यावरण या गतीविधी विचार परिवर्तनासाठी प्रारंभ झाल्या असून त्याद्वारे सज्जनशक्ती जागरणाचे कार्य केले जात आहे.असे जांभोरकर यांनी उदबोधनातून सांगितले. सिता मातेच्या शोधार्थ लंकेत जाण्यासाठी वीर हनुमानजींना त्यांच्यातील शक्तीचे स्मरण करून द्यावे लागले तव्दतच रा.स्व.संघाचे स्वयंसेवक राष्ट्रजागरणाचे कार्य करीत आहेत.याकार्यात संत महात्मा यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.विपत्तीच्या वेळी मदतीसाठी संघस्वयंसेवक पुढे असतात जनमानसाची भावना जागवण्याचे काम संघ करीत आहे असे उद्गार विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी कमल चांडक यांनी काढले.सांघीक व्यायाम योगाचे संचालन पराग कुलकर्णी,प्रार्थना गायनाची संथा हरिदास चुंगडे यांनी दिली. प्रमुख अतिथी व मुख्यवक्ता यांचे स्वागत गजानन मुंजे,माधवराव बनकर यांनी केले.उत्सवात संघाचे जिल्हा, तालुका,नगर,उपखंडाचे दायित्वधारी अधिकारी,कार्यकर्ते, आबालवृद्ध स्वयंसेवक,निमंत्रित नागरिक,पत्रकार उपस्थित होते.ध्वजावतरणाने उत्सवाचे समापन झाले. पथसंचलनावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव तेल्हारा शहरात विजयादशमीच्या औचित्याने २९ ऑक्टोबर रोजी सुमारे १५० गणवेशधारी स्वयंसेवकांनी सायंकाळी ५:३० वाजता स्वामी विवेकानंद ज्ञानपीठातून शानदार पथसंचलन केले.नागरिकांनी पथसंचलन मार्गावर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढून सजावट केली होती.घराघरातून पुष्पवर्षाव करून संचलनाचे स्वागत करण्यात आले.स्वामी विवेकानंद ज्ञानपीठात संचलनाचे विजयादशमी उत्सवात रूपांतर झाले.शहर सेवा प्रमुख सुनिल बावस्कर यांनी संचलनाचे सूत्रसंचालन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button