बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
मीराबाई जाधव यांचे निधन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी….!!!!
चिखली : येथील दलीत मित्र सुखदेवराव जाधव यांच्या पत्नी तसेच सुशीलकुमार सुखदेवराव जाधव यांच्या मातोश्री, चिखली नगरपालिकेतील सेवानिवृत्त जन्म-मृत्यू निबंधक मीराबाई सुखदेवराव जाधव यांचे मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.
मीराबाई जाधव यांनी नगरपालिकेत सेवा बजावताना प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे तसेच नातेवाईक असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. ८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी
१२.०० वाजता बौद्ध स्मशानभूमी, गौरक्षण वाडी येथे पार पडला✍🏻



