Uncategorizedबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सावखेड भोई येथे चाकूचा धाक दाखवत दहशत; एकाविरुद्ध गुन्हा दाखल!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी;– शंकर शिवरकर

शिवाजी महाराज चौकात भररस्त्यात चाकूसह शिवीगाळ; आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यासह गुन्हा

देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई येथील शिवाजी महाराज चौकात भररस्त्यात हातात चाकू घेऊन शिवीगाळ करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत शेषराव जाधव (वय ४५, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन काशीनाथ वाडेकर (वय ३४, रा. सावखेड भोई) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास भरत जाधव हे शेतातून घरी परतत असताना शिवाजी महाराज चौकात आरोपी हातात मोठा चाकू घेऊन शिवीगाळ व आरडाओरड करत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी जाधव यांनी आरोपीला सार्वजनिक ठिकाणी चाकू घेऊन शिवीगाळ करू नको, असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीसह इतर उपस्थितांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच हातातील चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी कायमी अपराध क्रमांक ३२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २९६, ३५१(२), ३५१(३) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद सहाय्यक फौजदार निलीमा जाधव यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button