जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेतर्फे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांचा गौरव

मुक्ताईनगर : आज प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला नियंत्रण संघटना, मुक्ताईनगर शाखेतर्फे मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय श्री. आशिष अडसूळ साहेब यांचा गौरव प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ड्रॉप केस मोहिमेद्वारे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने तालुक्यातील कुऱ्हा, लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये सकाळच्या सुमारास धाडसत्र राबविले.

या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, शस्त्रे, जिवंत काडतुसे, मोबाईल, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच वन्य प्राण्यांचे कातडे जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे 58 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या उल्लेखनीय व धाडसी कारवाईची दखल घेत मुक्ताईनगर तालुका प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री. आशिष अडसूळ साहेब यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे, जिल्हा संघटक तालुकाध्यक्ष हकीम चौधरी, तालुका सचिव विजय खराटे, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, जिल्हा सदस्य बी. डी. गवई, समाधान पाटील, माजी गटविकास अधिकारी राजेशकुमार जैन, सुपडू बोदडे, जगदेव इंगळे, सौ.भारतीताई लोखंडे, रविंद्र शिरसोदे,तसेच जगन्नाथ चांगदेवकर,दिनेश कोळी,भास्कर कोळी, जे.के चौधरी, व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button