मनसगाव ते खिरोडा रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात बुजवा; संबंधित विभागाला हनुमान ग्रुपच्या वतीने आंदोलनाचा इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत,
संग्रामपूर दि.१७/१०/२६ सविस्तर वृत्त असे की शेगाव ते जळगाव जामोद या मेन रोडवरील संग्रामपूर तालुक्यातील ग्राम खिरोडा ते मनसगाव या दोन गावांमधील अंतरामध्ये रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून दररोज या खड्ड्यांमुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. एवढेच नव्हे तर बरेच अपघात सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही पाहिजे याकरिता संबंधित विभागाने खिरोडा ते मनसगाव या दोन गावांमध्ये शेगाव ते जळगाव जामोद या मेन रोडवरील जेवढे काही खड्डे असतील ते खड्डे येत्या दोन दिवसात बुजवण्यात आले नाहीत तर जय हनुमान ग्रुपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाला देण्यात आलेला आहे. तालुक्यातील खिरोडा ते मनसगाव रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. तसेच वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालवत असताना तारेवरची कसरत करून वाहने चालवावे लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे चुकवितांना वाहनधारकांसोबत दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. दररोज या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ चालू असते. तसेच संग्रामपूर तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी याच रस्त्याने जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ चालू असते. तरीसुद्धा संबंधित विभाग या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे. तसेच रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नसल्यामुळे दुचाकी वाहने या खड्ड्यांमध्ये आढळून दररोज अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात निर्माण झालेली आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दुचाकी व फोर व्हीलर वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे येत्या दोन दिवसात बुजवण्यात यावे यासाठी जे हनुमान ग्रुपच्या वतीने संबंधित विभागाला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हनुमान ग्रुपचे शिवा शांताराम दाणे यांनी दिला आहे.



