अपघातमहाराष्ट्र

भीषण अपघात! आयशर गाडीने दुचाकी ला मागून उडवली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; ५ वर्षाचा चिमुकला सुदैवाने बचावला! बुलढाणा खामगाव रस्त्यावर भादोल्या जवळ झाला अपघात…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

भरधाव व अनियंत्रित आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून उडवले. या अपघातात दुचाकी स्वार दोघांचा जागी तर एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दैवत बरतर म्हणून दुचाकी वरील ५ वर्षाचा चिमुकला बचावला असून त्याला किरकोळ मार लागला आहे. बुलढाणा खामगाव रस्त्यावर बुलढाणा शहरापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरे पेट्रोल पंपा जवळ आज, १४ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजता हा अपघात झाला.
अपघातात ठार झालेले नात्याने पती-पत्नी व सून आहेत. बब्बू शेख मुंसी (५५), अमिदाबी शेख बब्बू (५०), फिरदोस अंजूम शेख नदीम (२२) अशी मृतकांची नावे असून ते भादोला येथील राहणारे आहेत. शेख नमीर शेख नदीम (४) हा चिमुकला अपघातातून सुदैवाने वाचला आहे. शेख परिवारातील चौघे दुचाकी ने बुलढाण्यावरून भादोल्याकडे जात होते. यावेळी बुलढाण्या कडून खामगाव कडे जाणाऱ्या एका आयशर वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर आयशर वाहन भरधाव वेगाने खामगाव कडे पळून गेल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.
अपघातात बब्बू शेख मुंसी व त्यांची पत्नी हमी दाबी शेख बब्बू यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर बाबू शेख मुंशी ह्याचा उपचारा दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात वाचलेल्या शेख नमीर यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button