बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भाववाढीचा फटका; जेवणातून कांदा झाला गायब!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : कांद्याच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणावर दिसू लागला आहे. आठवडी बाजारात देऊळगाव राजा येथे 72 रु किलो कांदा विक्री होताना दिसले,वाढत्या किमतीमुळे अनेक कुटुंबांनी जेवणातील कांद्याचे प्रमाण कमी केले असून, काहींच्या स्वयंपाकघरातून तर कांदा जवळपास गायब झाल्याचे चित्र आहे.

भाजी, आमटी, पोहे, मिसळ यांसह अनेक पदार्थांची चव कांद्याशिवाय अपुरी वाटते. मात्र, वाढलेल्या दरामुळे रोजच्या वापरासाठी कांदा खरेदी करताना गृहिणींना खर्चाचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वी किलोने खरेदी केला जाणारा कांदा आता गरजेपुरताच घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.

कांद्याच्या दरवाढीचा फटका केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे, तर हॉटेल, खानावळ आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही बसत आहे. वाढता खर्च आणि ग्राहकांची अपेक्षित किंमत यांचा ताळमेळ साधताना व्यावसायिकांचीही कसरत होत आहे.
हॉटेल मध्ये देखील कांदा ग्राहकांना नाश्ता आणि जेवणात गायब दिसत आहे.

कांद्याच्या दरात स्थिरता येऊन भाव कमी व्हावेत, अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. दर कमी झाल्यास पुन्हा कांदा स्वयंपाकघरात पूर्वीप्रमाणे मुबलक दिसेल, अशी आशा गृहिणींना आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button