भालगाव येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी बुलढाणा प्रशांत चव्हाण
भालगाव : शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण भालगाव येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून रंगीबेरंगी सजावटीने सजविले. बैलांच्या शिंगांना रंग लावून त्यांना फुलांच्या माळा, झूल व घुंगरांनी सजविण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा व आरती करून बैलांना नैवेद्य देण्यात आला.
गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या पारंपरिक सणाचा आनंद घेतला. वर्षभर शेतकामात साथ देणाऱ्या बैलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीत बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे.



