Uncategorized
मनसगाव येथे तीन दिवसात दोन तरुण शेतकरी पुत्राच्या आत्महत्या

मनसगाव येथे तीन दिवसात दोन तरुण शेतकरी पुत्राच्या आत्महत्या
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
शेगाव मिलिंद चराटे

- तालुक्यातील ग्राम मनसगाव येथे तीन दिवसात दोन शेतकरी पुत्रांनी आत्महत्या केल्या आहेत, हे दोन्ही शेतकरी पुत्र अल्पभूधारक शेतकऱ्याचे आहेत आणि हे दोन्ही युवक आपल्या वडिलांची शेती स्वतः करीत होते आणि आपल्या आईवडीलासह आपल्या पत्नी मुलांना सांभाळत होते ,
- यामध्ये दिनांक 9/2/2023रोजी आशिष गोपाल कंकाळ वय अंदाजे34वर्ष या युवकाने रात्री11ते12वाजताची दरम्यान शेगांव येथे रेल्वे पटरीवरआत्महत्या केली तर दिपक गुलाबराव वाकोडे वय वर्ष अंदाजे33या युवकाने दिनांक12/2/2023रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,
- या दोन्ही युंवकांच्या वडिलांवर शेती कर्ज आहे, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी,कर्जबाजारीपणा यामुळे आजरोजी संसाराचा गाढा चालवणे खूप कठीण झालेले आहे,त्यामुळे अशाच काही विचारातून वैतागून या युवकांनी आत्महत्या केली असल्याचे बोलल्या जात आहे या दोन्ही युवकांना लहान लहान मुले असून त्यांच्या संगोपनाच्या जबाबदाऱ्या आता त्यांच्या आईवर आलेल्या आहेत त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्याने शासनाने त्यांना त्वरित मदत द्यावी अशी मागणी त्यांचे कुटुंब व गावकऱ्यांकडून होत आहे।
1,मयत आशिष गोपाल कंकाळ
2,मयत दिपक गुलाबराव वाकोडे




