महाराष्ट्रविदर्भ

खिरोडा पुलावरील त्या भीषण दुर्घटनेला १४ वर्षे; १९ निष्पाप जीवांच्या आठवणी आजही डोळ्यांत अश्रू आणतात…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २६ सप्टेंबर २०२६
शेगाव–पातुर्डा बस पुलावरून नदीत कोसळली १९ जणांचा दुर्दैवी मृत्यू अनेक जण गंभीर जखमी — मृतांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या खिरोडा बस दुर्घटनेला आज १४ वर्षे पूर्ण झाली. दि. २६ सप्टेंबर २०१२ रोजी शेगाव–पातुर्डा मार्गावरील एसटी बस खिरोडा येथील पुलावरून खाली कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या हृदयद्रावक अपघातात १९ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या आप्तेष्टांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने त्या काळात परिसर सुन्न झाला होता. अपघातानंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काळ पुढे सरकला, अनेक वर्षे उलटली मात्र त्या काळ्या दिवसाच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. अपघातात जीव गमावलेल्या १९ निष्पाप प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी २६ सप्टेंबर हा दिवस कायमचा वेदनेचा दिवस ठरला आहे.
आज या दुर्घटनेच्या स्मृतींना उजाळा देताना मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व मृतात्म्यांना विनम्र अभिवादन……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button