अकोलामहाराष्ट्रविदर्भ

ब्रह्माकुमारीज पाठशाला, जुने शहर तेल्हारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी हर्षोल्हासात संपन्न.

​तेल्हारा (प्रतिनिधी):
स्थानिक जुने शहर तेल्हारा येथील ब्रह्मकुमारीज पाठशाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा अत्यंत
हर्षोल्हासात ,चैतन्यमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात परमपिता परमात्मा शिव बाबांच्या स्मरणाने करण्यात आली.
​या प्रसंगी ब्रह्मकुमार श्याम भाई यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आध्यात्मिक महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले आणि गोड भक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन वंदनाताई खारोडे यांनी केले. या सोहळ्यात श्रीराधे-कृष्णाची आकर्षक झाकी सजवण्यात आली याबरोबरच लहान मुलांचे सुंदर डान्स सादरीकरण झाले.
​कार्यक्रमा दरम्यान पारंपारिक पाळणा गीत तसेच केक कटिंग करून श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व माता-भगिनी व नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी उपस्थित सर्वांना ईश्वरीय प्रसाद वाटप करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button