अंतुर्ली येथील तीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-
शुभम प्रभाकर महाजन या तीस वर्षीय युवकाने अंतुर्ली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विजय डीगंबर महाजन रा.अंतुर्ली ता मुक्ताईनगर मयताचे चुलत भाऊ यांच्या खबरीवरून, शुभम प्रभाकर महाजन वय तीस वर्ष हा त्याची पत्नी, आई-वडील, भाऊ आणि आजोबा या कुटुंबीयां समावेत अंतुर्ली येथे राहतो. शुभम हा न्यूज अँड सॉफ्टवेअर कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कामाला होता व दिवाळीनिमित्त तो घरी आलेला होता.
दिनांक 7 नोव्हेंबर रोजी 11:15 वाजेच्या सुमारास शुभम हा वरच्या रूम मध्ये काम करत होता व दरवाजा उघडत नव्हता त्यावेळी कुटुंबीयांनी दरवाजा ठोकला व आवाज दिला परंतु शुभमचा प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला असता घरात आत जाऊन पाहिले असता शुभमने स्लॅबला असलेल्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले यावेळी कुटुंबीयांनी शुभम यास खाली उतरून त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कोणतीच हालचाल करीत नसल्याने गावातील डॉक्टर यांना बोलविण्यात आले यावेळी गावातील डॉक्टरांनी शुभम हा मयत असल्याचे सांगितले व पुढील कारवाईसाठी मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला.



