बोडखा येथे एक गाव एक गणपती. उपक्रम: भीमाशंकर कातव यांच्या हस्ते बाप्पाची आरती. विविध कार्यक्रमांनी नवचेतना:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.२०/९/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावात एक गाव एक गणपती या अत्यंत स्तुत आणि आदर्श उपक्रमांतर्गत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि एकोप्याने साजरा केला जात आहे. संपूर्ण गावाने एकत्र येत एकाच बाप्पाची स्थापना केली असून, रोज संध्याकाळी सर्व गावकरी मंडळी बाप्पाच्या महाआरतीसाठी एकाच ठिकाणी एकत्र येत आहे. नुकतेच या सार्वजनिक गणेश उत्सवात विश्व हिंदू परिषद अखंडचे पदाधिकारी भीमाशंकर देविदास कातव यांनी आपल्या सहकुटुंब परिवाराच्या शुभ हस्ते श्री गणेशाचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पातळ परिवार पारंपरिक वेशभूषित बाप्पाची मनोभावे आराधना केली.
विविध उपक्रमामुळे गावामध्ये नवचैतन्य: केवळ धार्मिक विधीवरच मर्यादित न राहता, गावातील महिला. आणि विशेषता विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी गणेश मंडळाच्या वतीने अनेक स्तुत्य उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील कलागुणांना वाव मिळत असून, तरुणांचा उत्साह द्विगुतीत झाला आहे.
गावकऱ्यांची अभेद्य एकता:
या उत्साहाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक नागरिक. लहान थोर सर्वजण एकत्र येऊन एकाच गणपती बाप्पाची आरती करतात. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता संपूर्ण गावकरी मंडळी या महाआरतीला न चुकता उपस्थित राहतात. बोडखा गावातील सर्व नागरिक आणि स्थानिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीमुळे आणि परस्पर सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अतिय शिस्तबद्ध आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न होत आहे………✍️



