खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाण्यात व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगचा भव्य जिल्हास्तरीय सोहळा लवकरच; नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह पत्रकारांच्या प्रश्नांवर होणार मंथन

बुलढाणा : व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात लवकरच मोठ्या स्वरूपातील जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार असून, नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा आणि संघटनेच्या आगामी कार्याचा आराखडा या कार्यक्रमाचे प्रमुख विषय असणार आहेत.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वडनेर भोलजी येथील हॉटेल विश्वगंगा येथे पत्रकार पवन भालेराव यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू विंगचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष जफर खान अतहर खान होते. आगामी कार्यक्रमाची रूपरेषा, पदाधिकारी नियुक्ती आणि जिल्ह्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

आगामी कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग राहण्याची शक्यता आहे. या वेळी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पत्रकारांच्या समस्या, प्रशासकीय पातळीवरील अडचणी, पत्रकारांच्या हक्कांचे प्रश्न, बदलत्या पत्रकारितेतील आव्हाने आणि पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवरही चर्चा होणार आहे.

व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या कार्यात पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, कौशल्यविकास, पत्रकारिता व प्रेस स्वातंत्र्य, संशोधन तसेच पत्रकारांच्या कल्याणाशी संबंधित विविध विषयांना महत्त्व दिले जाते. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात होणारा आगामी कार्यक्रम पत्रकारांच्या विविध प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बैठकीस बुलढाणा जिल्हा सचिव शेख सरदार शेख कदीर, मुख्य संपादक साप्ताहिक लेखणी शस्त्र; जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मो. तौसिफ शेख, मुख्य संपादक साप्ताहिक पब्लिक रिकॉग्निशन; नांदुरा तालुकाध्यक्ष शेख राजीक, मुख्य संपादक नांदुरा एक्सप्रेस न्यूज; न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजचे मुख्य संपादक अमीन खान; सियासी तकदीरचे नांदुरा प्रतिनिधी अब्दुल नजीर; नांदुरा एक्सप्रेस न्यूजचे प्रतिनिधी शेख सत्तार व मोहम्मद अशपाक तसेच महाभूमीचे तालुका प्रतिनिधी पवन भालेराव मोहम्मद इकबाल सर लेखणी शस्त्र प्रतिनिधी गुलजार शेख लेखणी शस्त्र महाराष्ट्र प्रेस फोटो ग्राफर
महेबुब शेख. लेखणी शस्त्र विदर्भ विशेष प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, आगामी कार्यक्रमाची तारीख, स्थळ, प्रमुख उपस्थिती आणि कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना या माध्यमातून कोणते व्यासपीठ मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button