महाराष्ट्रविदर्भ

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध करून द्या – उमेश इंगळे

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध करून द्या – उमेश इंगळे

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार वैद्यकीय अधिक्षका आरती कुलवाल, डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांच्या वर तात्काळ कारवाई करा व गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे स्थानिक अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती रुग्ण महिलेला टी टी च्या इंजेक्शन करिता स्त्री रुग्णालयात भटकंती करावी लागत आहे येथील परिचारिका गर्भवती रूग्ण महिलेला इकडच्या वार्डातून तिकडच्या वार्डात विचारपूस करण्याकरिता पाठवत आहेत परंतु गेल्या आठ दिवसापासून टि टी च्या इंजेक्शनचा औषधी साठा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नाही वैद्यकीय अधीक्षका यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे सदर औषधीसाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी संबंधित डॉक्टर,परीचारीका व अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केली असता आणखी एक महिना सदर औषधी साठा उपलब्ध होणार नाही असे सांगण्यात आले स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिक्षीका आरती कुलवाल यांचे दुर्लक्ष आहे हा औषधी साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांची आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी अकोला, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या कडे तक्रार केली असुन अश्या कामचुकार कर्मचारी यांच्या वर तात्काळ कारवाईची व लवकरात लवकर औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button