बुलढाणा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चिखलीत भव्य कार्यक्रमांची रेलचेल; धम्मदेसनासह प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

सटार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली,,,,, प्रतिनिधी

दि. १ मे रोजी सकाळी अभिवादन तर सायंकाळी भदंत बी. राहुलो यांचे धम्मदेसना ; दि. २ मे रोजी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा, दोन गटांमध्ये सहभागाची संधी

चिखली/(दै. आम्ही चिखलीकर )- सम्राट अशोक- फुले -आंबेडकर जयंती उत्सव समिती चिखलीच्या  वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात बौद्ध विचारांची जागृती व्हावी आणि युवकांमध्ये धम्माविषयी जाण वाढावी या उद्देशाने दोन दिवसीय कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्रिशरण पंचशील बौद्धाचार्य यांच्या हस्ते सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्याच दिवशी सायंकाळी ८.३० वाजता फुले – आंबेडकर वाटिका येथे भदंत बी. राहुलो यांचे धम्मदेसना आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नागसेन बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच दि. २ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता नागसेन बुद्ध विहार येथे “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व बक्षिसे देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा दोन गटांत होणार असून, पहिला गट पाचवी ते बारावी (इयत्ता ५ वी ते १२ वी) विद्यार्थ्यांसाठी आहे, तर दुसरा गट सर्व वयोगटांसाठी खुला आहे.
कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button