तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथील अण्ण नागरी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- प्रशांत चव्हाण
देऊळगाव राजा :- दि.15 जून तालुक्यात गोरगरिबांना राशन मिळत नसल्याने तसेच वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे.
गरजू व्यक्ती राशन पासून वंचित राहत असल्याचे दिसून आले ,तरी शासनाकडून दुर्लक्ष सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
अनेक वेळी तक्रारी देऊन सुद्धा तसेच कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही ,
व नागरिकांना होणारा त्रास गोरगरिबांना हक्काचा मिळणारा राशन सुद्धा मिळत नाही.
अन्नपुरवठा विभागाला विचारले असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला .
शासन लाखो रुपये खर्च करून सुद्धा एवढा मोठा अण्ण साठा पुरवतो प्रशासकाच्या हलगर्जी पणामुळे नागरिकांना वेळोवेळी सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे ,
काही सामाजिक संघटनांनी जर याच्यावर शासन निर्णय घेतला नाही तर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे,
गोदाम मध्ये राशन उपलब्ध असताना सुद्धा .शासन तहसील कार्यालयाकडून पूर्वत नसल्यामुळे गोरगरिबांना त्रास सहन करावा लागत आहे .



