खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

नरेंद्र मोदी संशयाच्या भोवऱ्यात?

  राजीव गांधी प्रधानमंत्री असतांना फ्रान्सच्या बोफोर्स कंपनीकडून भारताने  तोफा घेतल्या होत्या.तेंव्हा तोफांच्या सौदा मधे दलाली घेतल्याचा संशय राजीव गांधींवर घेतला गेला.त्याच मंत्री मंडळातील अर्थ मंत्री व्ही पी सिंग यांनी अमेरिकेची फेयरफॅक्स या टिम ला चौकशी चे आदेश दिले.सिंग यांनी त्यांच्या अधिकारात चौकशी चे आदेश दिल्यामुळे राजीव गांधी आणि व्ही पी सिंग यांच्यात खटके उडाले.अरे यार!मेरी तहकिकात करने के पहले,मुझे पुछ तो लेते.आता  असे चौकशी लावण्याचे धाडस नितीन गडकरी किंवा निर्मला सीतारामन करतील का? आम्ही वाट पाहातो.
 व्ही पी सिंग यांनी या दलाली चे भांडवल केले आणि मंत्री पदाचा राजीनामा देऊन मोकळे झाले.सोबत हेच भाजप चे नेते होते.लोकसभा निवडणूक लागली.त्यात याच मुद्द्यावर चारशे पार खासदार असलेल्या कांग्रेस ला अल्पमतात जावे लागले.भाजप ने व्हि पी सिंग यांना समर्थन देऊन केंद्रात सरकार बनवले.आता त्याच भाजपचे लोकांना आम्ही आठवण करून देत आहोत.
  आता भाजपने सहा हजार कोटींचे रोखे आर्थिक संस्था कडून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले.सुप्रिम कोर्टाने सक्ती केली.आणि देणगीदार कंपनीची नांवे आणि देणगी जाहीर करायला भाग पाडले.आम्हाला कळले तरी, चौकीदारही चोर है.
 भाजप ने इडीची चौकशी केलेल्या कंपन्यांनी सुद्धा भाजप ला देणगी दिली आहे.उद्या पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपी उचलला .आणि पोलिस वेल्फेअर असोसिएशन साठी त्याच्याकडूनच देणगी घेतली तर?असाच प्रश्न आता मोदी आणि शहा यांचेवर उठत आहेत.मोदी ,शहा यांचे उत्तर कोर्टात जे देतील ते पण आता लोकसभा निवडणूक प्रचारात कसे देणार?
भाजप ने मक्तेदार आणि इडीचे आरोपी असलेल्यांकडून देणगी घेतलीच कशी? यात कोणती नितीमुल्ये आहेत? ही नितीमुल्ये ,ही नितीमत्ता,ही वृत्ती,ही प्रवृत्ती देशाचा विकास करील ,यावर आम्ही जनता कसे विश्वास ठेवणार? मोदीजी,शहाजी सवाल तो बनता है भाई! जबाब तो देना ही पडेगा.कोर्ट में कोई निष्णात वकिल जबाब देकर जस्टीस को गुमराह कर सकता है.शायद जस्टीस गुमराह नहीं होंगे.लेकिन १३५ करोड जनता को कैसे समझाओगे?हमने तो तुम्हारा नमक भी नहीं खाया है.मोफत का  अनाज तो बिलकुल नही.हमने तो तुम्हारा रूमाल भी नहीं लिया है.साडी की तो दूर की बात है.हम कैसे सोचे,अन्नदाता और साडीदाता हमारे प्रती इमानदार है? ये जुमला नही, गफला लगता है.
 राम मंदिर आणि धारा ३७० संदर्भात खुश होऊन अंध भक्त आणि मंद भक्त भाजप ला मतदान करीतच होते.आम्ही धुंद भक्त सुद्धा मतदान करीत होतोच.तर मग,काय गरज पडली होती,इडी लावून देणगी घेण्याची?

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button