बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिद्ध

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व बँक खाते लिंकिंग पूर्ण करावे – जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. ११ : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची दुसरी यादी आज, दि. ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

ही यादी जिल्ह्यातील संबंधित गावांच्या ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, तलाठी कार्यालय, संबंधित बँक शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील नोटीस बोर्डवर शेतकऱ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी व आधार कार्ड घेऊन जवळच्या ई-सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अद्याप बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत, त्यांनी संबंधित बँक किंवा संस्थेशी संपर्क साधून खाते आधारशी लिंक करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास संबंधित शेतकऱ्यांना तालुकास्तरीय अथवा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येणार आहे.

शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आधार प्रमाणीकरणासह आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी योजनेची दुसरी यादी तपासून तातडीने कार्यवाही करावी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button