बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपाच्या वाटेवर काँग्रेसला देणार फारकत अन भाजपशी करणार घरोबा.

काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपाच्या वाटेवर काँग्रेसला देणार फारकत अन भाजपशी करणार घरोबा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी- संजय खेडेकर

चिखली- मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपाशी घरोबा करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहे. त्यांचा भाजपात होणारा प्रवेश राजकीय वर्तुळात निश्चित मानल्या जात आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले काँग्रेसचे राहुल बोंद्रे मुकुल वासनिकांची साथ घेऊन राजकारणात एक एक पायरीवर चढत गेले. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या तालमीत त्यांची राजकीय जडणघडण होत गेली. राजकारणाबरोबरच कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रात विविध संस्थांच्या माध्यमातून आपला दब दबा निर्माण केला. आपले वडील तात्यासाहेब बोंद्रे यांच्याकडून बाल कडू घेऊन चिखली शहराच्या नगराध्यक्ष पदापासून ते 2 वेळा आमदार झाले. गेले दीड वर्षांपूर्वीच म्हणजे मागील झालेल्या विधानसभा निवडणुकी अगोदर राहुल बोंद्रे हे भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या होत्या. त्यांचे मन तळ्यात मळ्यात सुरू असताना त्यांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले. परंतु आता त्यांच्याकडे असलेल्या सहकार आणि शैक्षणिक संस्थांमधील तक्रारी, चौकशांना पूर्णविराम मिळावा म्हणून बोंद्रे भाजपामध्ये जाण्याची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांच्यासाठी येणारी कोणती तारीख शुभ ठरते हा येणारा काळ ठरवेल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button