महावितरणामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले दुहेरी संकट! लोड सेटिंग थांबा अन्यथा परीणामांना सामोरे जा! उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सज्जड इशारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
पावसाने दिलेली ओढ आणि पीक जगण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू झाली धडपड त्यातही महावितरणाने लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांची चालवलेली थट्टा यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे महावितरणामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले असून लोड शेडिंग न थांबवल्यास महावितरणाने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा सज्ज इशारा जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने दिला आहे.
आज शिवसेनेने महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना आपल्या मागण्याची निवेदन सादर केले. यात नमूद आहे की, बुलढाणा जिल्ह्यात घाटावर आणि घाटाखाली पावसाने वेगवेगळे स्वरूप यंदा दाखवले आहेत. घाटाखाली महापुराने दैना उडवली तर घाटावर दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. महावितरण कडून लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत. उपलब्ध पाण्याच्या स्तोतातून पीक जगवण्याचा आटापिटा मायबाप शेतकरी करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्याकडून पाण्याचा उपसा वाढला आहे. महावितरण कडून लोड शेडिंग च्या नावाखाली शेतकऱ्यांना मोठा त्रास होतोय.



