खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

जिल्हाध्यक्ष आपल्या दारी : रावेर येथे नाभिक समाजाची बैठक उत्साहात

रावेर : महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळ पूर्व विभाग जळगाव जिल्हा अध्यक्ष मा. श्री. सचिनभाऊ सोनवणे यांच्या उपस्थितीत रावेर तालुक्यातील नाभिक समाजाची कार्यकारिणी संवाद बैठक उत्साहात संपन्न झाली.

आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नाभिक समाज मंडळ रावेर येथे ही बैठक पार पडली. यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत शिंदे, ज्येष्ठ मार्गदर्शक जगदीश दादा वाघ, भिकन दादा बोरसे, प्रशांत बाणाईत, उदय सोनवणे, गोपी साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रावेर शहर अध्यक्ष विकास आमोदकर यांच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सचिन सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्याध्यक्ष चंद्रकांत शिंदे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक जगदीश वाघ यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात प्रशांत बाणाईत यांनी नूतन कार्यकारिणीची माहिती उपस्थितांना दिली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत शिंदे, जगदीश वाघ, भिकन बोरसे यांनी नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्यावर प्रकाश टाकला. रावेर शहर अध्यक्ष विकास आमोदकर यांनी रावेर तालुक्यातील नाभिक समाजासमोरील समस्या जिल्हाध्यक्षांपुढे मांडल्या.

जिल्हाध्यक्ष सचिनभाऊ सोनवणे यांनी सर्वांना आश्वासन देत सांगितले की, “रावेर तालुक्यातील नाभिक समाजाच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू.”

या बैठकीत कार्यकारिणी सदस्य तुषार जलंकार, किरण चौधरी, राहुल वरणकर, हेमंत सोनवणे, गौरव श्रीखंडे, हेमंतराज चौधरी, ललित जलंकार, स्वप्निल चौधरी, प्रविण चौधरी, विक्रम चौधरी, मयुर सोनवणे, निहार मावळे, सतीश भंजाले, ऋषी वरणकर, किशोर चौधरी, विशाल चौधरी, रितेश चौधरी, सागर चौधरी, भूषण चौधरी, जयेश अट्रावलकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button