खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाबाबत राष्ट्रपतींना निवेदन…

मुक्ताईनगर(प्रतिनिधी)
मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीच्या वतीने देशातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत चिंता व्यक्त करत भारताच्या राष्ट्रपती महोदयांना तहसीलदार, मुक्ताईनगर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात सोनम वांगचुक यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच न्यायालयानेही प्रशासनाला त्यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आपल्या मागण्या शांततापूर्ण व घटनात्मक मार्गाने मांडण्याचा अधिकार असून, जनहितासाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीशी सरकारने संवेदनशीलतेने संवाद साधून तोडगा काढणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीने केंद्र सरकारला सोनम वांगचुक यांच्याशी तातडीने सन्मानपूर्वक चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे तसेच त्यांचे आमरण उपोषण लवकरात लवकर सन्मानपूर्वक समाप्त होण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
संवाद, न्याय, लोकशाही मूल्ये आणि मानवी संवेदनांचा सन्मान राखत या प्रकरणात सकारात्मक हस्तक्षेप करून सोनम वांगचुक यांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी विनंती राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.हे निवेदन मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरी, मुक्ताईनगर, जि. जळगाव (महाराष्ट्र) यांच्या वतीने सादर करण्यात आले. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष हकीम चौधरी,मनियार मजीद ट्रस्ट अध्यक्ष शेख कलीम हाजी रसूल, मनियार मस्जिद चे खजिनदार अहमद ठेकेदार, मनियार मस्जिद सदस्य फैजान शेख लियाकत, शिक्षण समिति अध्यक्ष अकील भाई, शेख साकिब शेख साबिर, रफीक मजीद मनियार,आदि मान्यवर उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button