बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रसामाजिक

परिचय संमेलन घेणे समाज प्रगतिशील असल्याचे लक्षण! भाई अशांत वानखडे

मलकापूर (प्रतिनिधी )धम्माच्या नीती मूल्याची कास धरून पैशाची व वेळेची बचत करण्यासाठी बौद्ध धर्मीय युवक युवती परिचय संमेलन,मेळावे घेणे गरजेचे असल्याने एक सामाजिक वसा घेऊन समाजात सध्या स्थितीत शासकीय, खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेले उपवर युवक युवती यांना एकाच मंचावर आणून सोईरीक जोडण्याचे काम परिचय मेळाव्याद्वारे सोयीस्कर होते, म्हणून परिचय संम्मेलन घेणे हे समाज प्रगतीचे लक्षण असल्याचे मत समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परिचय संम्मेलन अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांनी व्यक्त केले.प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगांव तसेच महानायक विचार मंच मलकापूर द्वारे जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे बौद्ध धम्मीय उपवर युवक युवती परिचय संम्मेलन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तैल चित्राचे पूजन करून स्मृतीशेष ऍड. ए.एस. इंगळे( माजी मुख्य प्रबंधक स्टेट बँक ऑफ इंडिया ) यांना आदरांजली व्यक्त करून परिचय संमेलनाची सुरुवात करण्यात आली.बौद्ध धम्मीय युवक युवती खूप मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित असून परिचय मेळाव्यात हजर राहून सामाजिक बांधिलकी जोपासतात याचा सार्थ अभिमान असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ.सिद्धार्थ मेश्राम यांनी यावेळी मार्गदर्शक म्हणून व्यक्त केले. विचार मंचावर यावेळी भाई अशांत वानखेडे, प्राचार्य डॉ.सिद्धार्थ मेश्राम यांच्यासह माजी प्राचार्य आनंदराव वानखेडे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव, उल्हासभाई शेगोकार जेष्ठ पत्रकार, आयोजक/निमंत्रक, बौद्धाचार्य आर. एम. सूर्यवंशी, भाऊसाहेब सरदार विदर्भ संघटक रिपाई ए, बौद्धाचार्य एल.सी.मोरे प्रामुख्याने हजर होते. प्रस्ताविक उल्हासभाई शेगोकार निमंत्रक,आयोजक यांनी केले. सदर कार्यक्रमात बौद्धाचार्य एल. सी.मोरे तसेच एस.आर.अवसरमोल सर यांचा सत्कार करण्यात आलाबौद्धाचार्य के यु बावस्कर सर, विजयकुमार तायडे सर, धनश्रीताई काटीकर अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना,ऍड.पी. एस.बोदवडे, सतीश दांडगे पत्रकार, चंद्रमोहन निकम सर, शांताराम गुरूचळ माजी पोलीस निरीक्षक , भाई विकास बोदवडे, पत्रकार किशोर इंगळे, जी. एन. इंगळे सर सचिव भारतीय बौद्ध महासभा , अनिल अवसरमोल सर,धर्मपाल इंगळे , रविभाऊ बाभुळकर,एम.ओ.सरकटे शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मलकापूर, एन.डी. इंगळे सर, प्रमोद भालशंकर सेवानिवृत्त इंटेलिजन्स ब्युरो, जे. बी. बनसोडे भुसावळ, सुरेंद्र हिवाळे, देवेंद्र नरवाडे, किशोर वानखडे,पत्रकार करण झणके आदि सह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने हजर होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार एन. के.हिवराळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आपल्या खुमासदार शैलीत संदीप वानखडे सर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कॉस्ट्रॉईब शिक्षक संघटना यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपवर युवक युवती तसेच पालक हजर होते सरणतय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button