स्थानिक बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत क्रांती दिनाचे औचित्य साधून पालक सहविचार सभा संपन्न.*

*स्थानिक बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत क्रांती दिनाचे औचित्य साधून पालक सहविचार सभा संपन्न.*
वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड मालेगाव – : सदर सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पालक रामकृष्ण बोरचाटे,रेश्माताई धबाले ,सोनाली ताई पखाले व ज्ञानेश्वर भाऊ सावळकर यांची उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस व भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालक सभेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुस्तक भेट व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील विविध क्रांतिकारका विषयी आपले मनोगत व्यक्त केले व वेशभूषा करून विविध क्रांतिकारकाची भूमिका आपल्या शब्दातून स्पष्ट केली. भाषण स्पर्धेमध्ये रित्त्विक धबाले ,वैष्णवी धोंगडे ,ईश्वरी सुरजूसे तर गीत गायन स्पर्धेमध्ये सिद्धार्थ बनसोडे, रिंकू अवचार ,कोमल कांबळे तसेच वेशभूषा स्पर्धेमध्ये ईश्वरी ईढोळे ,श्रद्धा वानखेडे ,लक्ष्मी कांबळे या विद्यार्थ्यांचे अनुक्रमे प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक देण्यात आले आजच्या पालक सभेमध्ये विद्यार्थी उपस्थिती, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ,वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती, नवोदय , शालेय शिस्त इत्यादी विषयावर पालकांसोबत चर्चा करण्यात आली. पालक सभेच्या शेवटच्या टप्प्यात शाळेचे मुख्याध्यापक यांनी पालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षा व शाळेच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले.पालक सभेचे संचलन व आभार प्रदर्शन जी. एस. शिंदे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.



