बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक

तेल्हारा न.प.कार्यालयामध्ये भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.०६: तेल्हारा नगरपरिषद कार्यालयामध्ये दिनांक ०६ डिसेंबर २०२३रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
०६ डिसेंबर १९५६ साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले असून त्यांचे महापरिनिर्वाण होऊन ६७ वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने नगरपरिषद कार्यालय तेल्हारांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सर्व प्रथम न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोहरकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन व हार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.यावेळी उपस्थितांकडुन “डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अमर रहे” असा जयघोष करण्यात आला.तसेच न.प.चे भारत बोदडे यांनी “भिमा तुज प्रणाम कोटी कोटी” हे गीत गाऊन या महामानवाला अभिवादन केले,व न.प.चे कर्मचारी शंतनु वक्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पाणीपुरवठा अभियंता निनाद आचार्य ,रुपेश जोगदंड अग्निशमन अभियंता ,नागेश भाकरे लेखापाल ,हिरालाल अग्रवाल कार्यालय अधीक्षक, अस्वार साहेब ,शोहेब खान साहेब,छाया शेंडे मॅडम ,जयंत बोळे ,उद्धव पोहरकार , संजय चोकणे ,ललित पारसकार ,धनु विखे मजीद भाई ,सुरेश भुजबले ,छांगाणी काका आदींनी आवर्जून उपस्थिती लगावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button