खानदेशमहाराष्ट्र

नाशिक विभागात औषध निरीक्षक पदे रिक्त; खडसेंच्या प्रश्नावर औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिक विभागात औषध निरीक्षक पदे रिक्त; खडसेंच्या प्रश्नावर औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिक विभागातील औषध निरीक्षकांची २४ मंजूर पदांपैकी २२ पदे रिक्त असून केवळ २ निरीक्षकांवर संपूर्ण विभागाचे कामकाज सुरू असल्याचा तारांकित प्रश्न आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला होता. तसेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये एकही कायमस्वरूपी औषध निरीक्षक नसल्यामुळे औषध विक्रीच्या तपासणीवर आणि गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता.

यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, नाशिक विभागात एकूण २६ पदे मंजूर असून त्यापैकी २४ पदे रिक्त आहेत आणि ज्या जिल्ह्यांमध्ये औषध निरीक्षक नाहीत तिथे सहाय्यक आयुक्त हे आयुक्तांच्या निर्देशानुसार काम पाहत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे प्रशासनाने २०२५ व २०२६ मध्ये ७१४ औषध विक्री पेढ्यांची तपासणी केली असून, त्यापैकी १२६ पेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत तर ६४ पेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. दरम्यान, औषध निरीक्षक, गट-ब मधील १५४ पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २२ मे २०२६ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मुलाखतीद्वारे लवकरच अंतिम नियुक्त्यांची कार्यवाही केली जाईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button