महाराष्ट्रविदर्भ
नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधतेचा ईशारा! २४ तासात पुराचे पाणी वान नदीपात्रामध्ये…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
दि.२० ऑगष्ट ; जाहीर सुचना
वान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्ष तर्फे प्राप्त माहितीनुसार आज दि. २०/०८/२०२४ रोजी रात्री ०७:०० वाजता वान प्रकल्प पाणी पातळी ४०७.१० मी असून ७४.०५% पाणीसाठा झाला आहे. वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचलन सुची नुसार प्रकल्पामध्ये ऑगस्ट अखेर ७२.७६ % पाणीसाठा असणे निर्धारित आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या २४ तासात येणाऱ्या येव्या नुसार वक्रद्वार प्रचलित करून पुराचे पाणी नदीपात्रामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे तसेच नदी पात्र ओलांडू नये. नदीकाठावरील गावांना आपल्या स्तरावरून सतर्क करण्यात यावे असे आवाहन
वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षा कडून करण्यात आले आहे.






