तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मा. मनिष वानखडे सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २९ एप्रिल २०२६
संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन येथे गोपनीय विभागात कार्यरत असलेले मा. मनिष वानखडे सर यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मनिष वानखडे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. पोलीस विभागात प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करत असताना समाजातील विविध घटकांशी त्यांनी जपलेला स्नेह व आपुलकी याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी सामाजिक बांधिलकी, लोकसेवा आणि आंबेडकरी विचारांची जपणूक यामध्ये मनिष वानखडे सर यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी सांगितले. विविध क्षेत्रातील उपस्थितांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचा हा सोहळा आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.



