बुलढाणा

देऊळगाव मही येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात हात साजरा.

देऊळगाव मही येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात हात साजरा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी दे. राजा: गजानन खिल्लारे, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योत्सना वसुदेव पाटील शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सेवानिवृत्त इंजिनियर गणेश दादा पाटील शिंगणे होते. ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व शाळा गावातून आपापल्या प्राकृत्यातून व लेझीम राष्ट्रभक्तीपर गीत, भारत माता की जय, नारे देत गावातून रॅली काढत ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन आपला सहभाग नोंदवला सर्व शाळा व शिक्षक आणि गावातील मान्यवर मंडळी , आजी माझी नेतेमंडळी उपस्थित होते. प्रत्येकी शाळांनी आपले देशभक्तीपर गीतावर डान्स व नाटिका सादर केले. यामध्ये सहकार विद्या मंदिर व मौलाना आझाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. सहकार विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी ट्रेनिंग चे अतिशय धाडसी प्रत्याशी के सादर केली. माझी कॅप्टन अशोक चेके सर व सुनील गुमलाडू सर यांनी आपल्या विद्यार्थ्याकडून मिलिटरी ट्रेनिंग चे प्रत्याशी के सादर करून घेताना चांगले परिश्रम घेतले. तसेच चालू घडामोडीवर आधारित नाटिका मौलाना आझाद शाळा यांनी मोबाईल ने आपल्या मुलाला वेड लावले या सत्य घटनेवर नाटिका सादर केली. गावातील नागरिक महिला व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सदस्य सरपंच व उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी चेके साहेब , ग्रामपंचायत कर्मचारी सर्व उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कार्यालयाचे कर्मचारी रंगनाथ शिंगणे यांनी केले. अशाप्रकारे शांततेत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button