दहा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव । तालुक्यातील कालखेड येथील मराठी पुर्व माध्यमीक शाळेत दहा दिवसाच्या आत अतिरिक्त शिक्षक नियुक्त न केल्यास लोकशाही मार्गाला अनुसरुन असणारे कोणतेही आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कालखेड ग्रामस्थांनी शेगाव गटशिक्षणाधिकारी यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे. |कालखेड येथील मराठी पूर्व माध्यमीक शाळेत वर्ग १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत, या शाळेतील दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाची सहा महिन्यापुर्वी बदली झालेली आहे. त्याबदल्यात अद्यापही कोणताही नविन शिक्षक आलेला नाही. त्यामुळे एकाच शिक्षिकेवर चारही वर्गाच्या शिकवणीचा भार आलेला आहे. त्यातच मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सुद्धा असल्याने त्यांना बऱ्याच अडचणी येतात. याबाबत विद्यमान मुख्याध्यापिका, सरपंच, उपसरपंच यांनी शिक्षण विभागाला वारंवार अर्ज देऊन व प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकाची मागणी केलेली आहे. तरीही शिक्षक मिळत नसल्याने येत्या दहा दिवसाच्या आत नविन शिक्षक नियुक्त नकेल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर सरपंच पवन बरिंगे, उपसरपंच पंडीत परघरमोर आदींसह सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामशिक्षण समीती अध्यक्ष संतोष वाकोडेसह सर्व सदस्य व पालकवर्गासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रति वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्या आहेत.



